18 January 2021

News Flash

मुंबईची भाषा हिंदी; तारक मेहता…वादावर निर्माते असित मोदी म्हणतात..

मी सर्व भाषांचा सन्मान करतो - असित मोदी

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील वादावर, निर्माते असित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे यात काही वादच नाही…आपण सर्व भारतीय आहोत आणि मी सर्व भाषांचा सन्मान करतो”.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात, या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. प्रसारित झालेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापुजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. यादरम्यान…बापुजींच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या भूमिकेवर आक्षेप घेतला असून, याप्रकरणी वाहिनीने वेळेत माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी…आपल्या ट्विटर अकाऊंटवरमुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटते असं मत मांडलं होतं.

सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी पसरल्यानंतर अखेरीस निर्माते असित मोदी यांनी याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे या स्पष्टीकरणावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 5:17 pm

Web Title: tarak mehata ka ulta chashma producer asit modi issue statement on hindi language issue psd 91
Next Stories
1 तारक मेहता नव्हे मराठीचे ‘मारक’ मेहता ! अमेय खोपकर संतापले
2 उद्धव ठाकरे म्हणतात ‘हा’ आहे १०० दिवसांतला महत्त्वाचा निर्णय
3 मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अद्याप माझ्यासमोर आलेला नाही : उद्धव ठाकरे
Just Now!
X