‘टाटा पॉवर कंपनी’ सातारा जिल्ह्यात २९ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. फोटोव्होल्टिक तंत्रज्ञानावर हा सौरऊर्जा प्रकल्प आधारित असेल.सातारा जिल्ह्यात पळसावडी येथे सुमारे १३० एकर जागेवर हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. ‘टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लि.’मार्फत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पातून तयार होणारी वीज घेण्यासाठी ‘टाटा पॉवर वीज वितरण कंपनी’ने २५ वर्षांचा वीजखरेदी करार केला आहे. डिसेंबर २०१३ पासून या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होईल अशी अपेक्षा आहे.