कोपर स्टेशनजवळ फास्ट डाऊन ट्रॅकजवळ आसनगाव लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने घरी जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा झाला. आज बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये पाऊस पडला. डोंबिवलीतही पावसाच्या काही सरी कोसळल्या. अशात आसनगाव लोकलमध्ये बिघाड झाल्याने डाऊन दिशेची वाहतूक काही काळ बंद होती. कामावरून घरी पोहचणाऱ्या मुंबईकरांना खोळंबा सहन करावा लागला.
अनेक लोकांनी ट्रॅकवर उतरून चालत जाण्याचा निर्णय घेतला. कोपरला लोकल खोळंबल्याने त्या लोकल मागून येणाऱ्या लोकल्सही खोळंबल्या. अनेक प्रवाशांनी काही काळ वाट पाहून शेवटी ट्रॅकवरून चालत जाण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांना घरी जाताना सहन करावा लागणारा खोळंबा दूर करण्यासाठी फास्ट लोकल्स स्लो ट्रॅकवरून पुढे नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.