16 January 2018

News Flash

दि एक्स्प्रेस लघुपट महोत्सव

दृष्य माध्यम हे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. एखादी गोष्ट वाचून, लिहून किंवा बोलून सांगण्याऐवजी दृश्य माध्यमातून दाखविली तर त्यातून अपेक्षित परिणाम साधला जातो.

प्रतिनिधी मुंबई | Updated: December 14, 2012 4:11 AM

दृष्य माध्यम हे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. एखादी गोष्ट वाचून, लिहून किंवा बोलून सांगण्याऐवजी दृश्य माध्यमातून दाखविली तर त्यातून अपेक्षित परिणाम साधला जातो. म्हणूनच तरुणाईला या माध्यमाचे सर्वाधिक आकर्षण आहे. गेल्या काही वर्षांत बीएमएमच्या कोर्सेसची संख्याही वाढली आहे. पण चांगल्या व्यासपीठाअभावी चांगल्या संकल्पना लोकांपर्यंत पोहचतच नाहीत. इंटरनेटसारखी माध्यमं उपलब्ध असूनही प्रतिष्ठित संस्था आणि व्यक्तींचे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय त्याला लोकमान्यता मिळत नाही. म्हणूनच चित्रपटनिर्मितीत रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना खास व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेले ५ ते १५ मिनिटांचे लघुपट ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या यू टय़ूबपेजवर अपलोड करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी सोनाली कुलकर्णी, अभिनय देव, भूपाल रामनाथन, गोपी कुडके आणि मंगेश हाडवळे ही चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रातील मान्यवर मंडळी परीक्षक म्हणून काम पाहतील. प्रत्येक विभागातील एका विजेत्याला १० हजार रुपयांचे आकर्षक गिफ्ट हॅम्पर बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे.
संपूर्ण माहिती असलेला आणि स्वाक्षरी केलेला प्रवेश अर्ज लघुपटाच्या डीव्हीडी/सीडी सोबत ‘दि इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड, दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१ या  पत्त्यावर पाठविता येईल. किंवा तुमचा लघुपट पाठवण्यासाठी 4shared.com  किंवा कोणतेही लोकप्रिय  सॉफ्टवेअर/संकेतस्थळ वापरून अपलोड करा व आम्हाला तो डाऊनलोड करता यावा यासाठी त्याची िलक आणि स्वाक्षरी करून संपूर्ण माहिती भरलेल्या प्रवेश अर्जाची स्कॅन केलेली प्रत  pratikriya@expressindia.com <mailto:pratikriya@expressindia.com>    किंवा facebook@expressindia.com वर ई-मेल करा. अधिक माहिती <https://www.loksatta.com/filmfest/>   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.         

विभाग
सर्वोत्कृष्ट संकलन  
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
सर्वोत्कृष्ट लघुपट – सामाजिक प्रश्न
सर्वोत्कृष्ट लघुपट – काल्पनिक
सर्वोत्कृष्ट लघुपट – माहितीपट
स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट लघुपट  

तुमच्या लघुपटाच्या फाईल ऑनलाईन कशाप्रकारे शेअर कराल ?
१) 4shared.com  या संकेतस्थळावर जा.
२) तुमच्या ईमेल आयडीच्या सहाय्याने नवीन खाते (अकाऊंट) बनवा. (या संकेतस्थळावर आधीच तुमचे खाते (अकाऊंट) असेल तर पुन्हा नवीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही.)
३) नवीन खाते बनवल्याचा तुम्हाला खात्रीचा (कन्फर्मेशन) ई-मेल येईल. (ज्यांचे आधीच खाते आहे त्यांनी वरील दोन (२-३) पाय-या अवलंबिण्याची आवश्यकता नाही.)
४) आता तुमच्या युजरनेम आणि पासवर्डने लॉगइन करा. (लॉगइन केल्यानंतर तुमच्यासमोर ‘4shared’  संकेतस्थळाचा डॅशबोर्ड येईल.)
५) अपलोड बटनावर क्लिक करा. (फाईल अपलोड असा डायलॉग बॉक्स स्क्रीनवर दिसेल)
६) तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर जेथे फाईल सेव्ह केली आहे तेथे जा, ती फाईल सिलेक्ट करा आणि ओपन वर क्लिक करा. (4shared.com) अपलोडिंग चालू करेल, जोपर्यंत अपलोडची प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत वाट पहा.) (अपलोड पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या अपलोड केलेल्या फाईलचे नाव डॅशबोर्डवर दिसेल.)
७) आता, फाईलच्या नावावर राईट क्लिक करा आणि गेट लिंक (Get Link) सिलेक्ट करा.
८) ती यू.आर.एल. (URL) कॉपी करून प्रवेश अर्जावर नमूद करा.

First Published on December 14, 2012 4:11 am

Web Title: the express short film festival
टॅग Festival,Film
  1. No Comments.