“राम मंदिराच्या संदर्भात यांच्यातलं कुणीही नव्हतं, आम्ही होतो त्या ठिकाणी, बाबरी पाडण्याकरता हे कुणी नव्हते हे घरी बसले होते. जनता जर पैसा देतीय तर एवढं वाईट का वाटातय? ज्यांना खंडणी वसूल करायची सवय असते, त्यांना जनतेचं समर्पण काय आहे? हे समजत नाही. म्हणून मनाममध्ये त्या जनतेच्या समर्पणाची त्या ठिकाणी सूई टोचते, हे आज स्पष्ट झालं.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज(बुधवार) आपल्या भाषणात भाजपावर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला. तर, यावेळी हिंदुत्व व राम मंदिराच्या मुद्यावरून देखील त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला फडणवीस यांनी वरील उत्तर दिलं आहे.

शरजील उस्मानीच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, आणि… – देवेंद्र फडणवीस

“बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं नव्हतं. बाबरी पाडल्यानंतर येडेगबाळे पळून गेले होते, बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. आता विषय असा झालेला आहे, बाबरी कुणी पाडली? आम्हाला माहिती नाही बाबारी आम्ही पाडलेली नाही. मात्र शिवसेना प्रमखांनी सांगितलेलं आहे, जर ते माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे. नुसता अभिमान नाही तर गर्व आहे. म्हणजे बाबरी पाडली कुणी? आम्ही नाही पाडली. सहा वर्षे केंद्रात सत्ता असताना देखील, राम मंदिरासाठी कायदा करा, कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय कुणी दिला, सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसे मागत आहेत. म्हणजे पैसे दिले कोणी? जनतेने दिले, आमचं नाव आलं पाहिजे.” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाबरी मशीद व राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपावर टीका करताना म्हणाले होते.

“काय हे तुमचं हिंदुत्व, काय हे तुमचं दुर्दैव”, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं!

याशिवाय, “ज्यावेळी काश्मीरमधून हिंदू पंडीत निराधार होऊन निर्वासितांचं जगणं आपल्या देशात जगत होते. तेव्हा शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मीरच्या हिंदू पंडिताना या हिंदुस्थानात स्थान मिळालं, घर मिळालं, रोजी रोटी मिळाली. हे येड्यागबाळ्याचं काम नव्हतं. आमचं हिंदुत्वा तुम्ही जागतव असताना,तुम्ही फुटीरतावाद्यांबरोबर काश्मीरमध्ये सत्ता स्थापली, कुठं गेलं होतं तेव्हा तुमचं हिंदुत्व? अफजल गुरुला ते हुतात्मा वैगरे म्हणत होते, त्यांच्या मांडीला मांडी लावताना तुमचं हिंदुत्व भ्रष्ट झालं नव्हतं? आम्हाला शिकवता हिंदुत्व? ३७० कलम काढल्यानंतर देखील व तुम्ही सत्तेत असताना देखील किती निर्वासित पंडितांना घरं दिली? याचा हिशोब पहिले मांडा आणि मग आमच्या अंगावर या, हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका. तेवढी तुमची पात्रता नाही.” असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

भाजपाला भारतमाता की जय बोलण्याचा अधिकार नाही; RSSचा हवाला देत ठाकरेंची टीका

तर, “जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं आहे. सत्तेसाठी केलेली ही तडजोड आहे, स्पष्टपणे त्यांनी हे सांगून द्यावं की हो, सत्ता पाहिजे होती म्हणून तडजोड केली. मैत्री वैगरे आपल्या बाजूला आहे, ते आमचे राजकीय विरोधक आहे. आम्ही लोकाशाहीत कुणालाही शत्रू मानत नाही, शत्रू कुणीच नाही आमचा. पण राजकीय विरोधक निश्चित आहेत.” असंही यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.