बौद्ध धर्माचा प्रसार भारतासह अनेक देशात झाला, त्याचप्रमाणे या धर्माचा प्रसार नेपाळ आणि तिबेट सारख्या देशात ही झाला. तेथील कलाकृतींची माहिती कलाप्रेमींना देण्यासाठी मुंबईच्या शिवाजी महाराज वस्तू संग्राहलयात हिमालयन आर्ट गॅलरीचे उद्घाटन आज तिबेटीयन कला आणि संग्रह ग्रंथालयाचे संचालक गेशे लाख्डोर यांच्या हस्ते सांयकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात तेथील मुर्तीकला, वाद्य, ध्यानी बुद्ध , मनी चक्र, नेपाळ मधील हिंदू आणि बौद्धधर्माची एकमेकांशी असलेला संबध अशा अनेक प्रकारच्या कलाकृती याठिकाणी भरविण्यात आल्या आहेत. नेपाळ, तिबेटचा बौद्ध धर्म आणि भारतातील बौद्ध धर्म यातील फरक आणि संबध आपल्याला या प्रदर्शनात पहायला मिळेल. हिमालयाच्या बर्फाळ शिखरामुळे इतर देशांशी फार कमी संबध असलेल्या तिबेटने आपली एक वेगळीच कला संस्कृती निर्माण केली आहे. तिबेटमध्ये बौद्ध धर्म ७ व्या शतकापासून स्थापित झाला आहे. येथील बौद्ध धर्म बुद्धाच्या सिद्धांतावरील असला तरी तेथील तंत्रवादामुळे येथील धर्मात किती वेगळेपण आहे याची माहिती येथे उपलब्ध आहे.
नेपाळमध्ये हिंदू आणि बौद्धधर्माचा मिलाप येथे असलेल्या मुर्त्यांवरुन दिसून येतो. येथील मुर्त्यांमध्ये हेंरब गणपती, इंद्र यांसारख्या देवता आहेत. येथील मुर्त्यांत आणि भारतीय मुर्तीकलेत सामत्या आहे. या प्रदर्शनात मैत्रेय ही बुद्धाची मुर्ती पहायला मिळेल. ही मुर्ती पूर्णत: मातीची बनविण्यात आली असून लडाखच्या चिमेट रिगजिन यांनी २०१३ साली वस्तू संग्राहलयातच ही मूर्ती ३ महिन्यांत बनवली. ही मुर्ती ज्याठिकाणी ठेवण्यात आली आहे त्याला गोंपा असे म्हणतात या प्रदर्शनातील हा भाग सर्वात आकर्षणाचा केंद्र आहे. धरमशाला आणि लडाख या ठिकाणाचे चित्रीकरण केलेल्या चित्रफीतीसुद्धा येथे उपलब्ध आहेत. मनिषा नेने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याठिकाणी जाऊन याचे चित्रीकरण केले होते.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला