कुर्ला- सायन (शीव) दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने गुरुवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली असून ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी सकाळी कुर्ला – सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.  जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

हिवाळ्यात रुळाला तडे जाण्याचे प्रमाण का वाढते?

हिवाळ्याच्या दिवासात थंडीमुळे रेल्वे रुळांचे आकुंचन होते आणि रुळाच्या काही भागात तडे जाण्याचे प्रमाण वाढते, असे रेल्वेमधील सूत्रांनी सांगितले.