एका विधवेसमोर निवडणुकीला उभे राहणे ही कुठली मर्दानगी असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. वांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची बुधवारी वांद्रे येथे प्रचार सभा झाली त्यावेळी त्यांनी हा हल्ला चढविला.  आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि ओवेसींवर जोरदार टीका केली. या निवडणुकीत दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे. एका विधवेच्या समोर नारायण राणे निवडणुकीला उभे आहेत. ही कसली मर्दानगी असा सवाल त्यांनी केला. नारायण राणे यांना कोकणात गाडले आता मुंबईत गाडणार असा निर्धार त्यांनी या सभेत व्यक्त केला. ओवेसी यांचा बुडबुडा या निवडणुकीत फुटणार असा दावाही त्यांनी केला.