दिवाळी म्हणजे आनंदाचा, दिव्यांचा, फटाक्यांचा, फराळाचा उत्सव. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या पहिल्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवसांत संगीत मैफली आयोजित करण्याचा प्रघात पडला आहे. सकाळी सहा किंवा सात वाजता सुरू होणाऱ्या मैफलींना रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. विविध संस्था, राजकीय पक्ष किंवा लोकप्रतिनिधींतर्फे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वीकेंडला दिवाळी पहाट कार्यक्रम कुठे कुठे होणार आहेत त्याचा धावता आढावा..

संगीत मैफिलींची पर्वणी

3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम

भाजपच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष आणि आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी ‘मुंबईकरांची दिवाळी’अंतर्गत दिवाळीच्या दिवसांत मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी संगीत मैफलींचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात रवींद्र साठे, उत्तरा केळकर, श्रीकांत नारायण, सोनाली कर्णिक, चिंतामणी सोहोनी, कविता निकम हे गायक-गायिका सहभागी होणार आहेत. अभिनेता तुषार दळवी व अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी कार्यक्रमाचे निवेदक आहेत. दहिसर, मुलुंड, गोरेगाव, दादर आणि गिरगाव येथे हे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांचे संयोजन ‘जीवनगाणी’ संस्थेने केले आहे.

* कधी- शुक्रवार, २८ ऑक्टोबर २०१६

* कुठे?- विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर, दहिसर क्रीडा फाऊंडेशनसमोर, दहिसर (पूर्व)

* केव्हा?- संध्याकाळी सहा वाजता

शनिवार, २९ ऑक्टोबर २०१६, मुलुंड जिमखाना, संभाजी पार्क पटांगण, द्रुतगती महामार्गाजवळ, मुलुंड (पूर्व), सकाळी सहा वाजता.रविवार, ३० ऑक्टोबर २०१६, नागरी निवारा परिषद, विभाग एक व दोन, नवीन म्हाडा सर्कलजवळ, गोरेगाव (पूर्व), स. सहा वाजता.

स्वरांच्या हिंदोळ्यावर

वि. दा. सावरकर प्रतिष्ठान व आराधना बॅनर्स आयोजित ‘स्वरांच्या हिंदोळ्यावर’ या कार्यक्रमात नाटय़गीत, भावगीत आणि भक्तिसंगीताची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. ज्येष्ठ गायक पं. चंद्रकांत लिमये यांच्यासह नीलाक्षी पेंढारकर, संगीता चितळे, श्रीरंग भावे, सीमा ताडे हे गायक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना विद्याधर ठाणेकर यांची असून निवेदन अभिनेते शरद पोंक्षे करतील.

* कधी?- शनि., २९ ऑक्टोबर २०१६

* कुठे?- प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली

* केव्हा?- सकाळी सव्वासहा वाजता

राहुल देशपांडे यांच्यासोबत संगीतमय पहाट

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि शुभदा शशिकांत पाटकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे सहभागी होणार आहेत. अभंग, नाटय़पदे, भक्तिगीते यांची संगीत मेजवानी रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रमाचे निरूपण डॉ. संजय उपाध्ये यांचे तर संकल्पना आणि संयोजन प्रसाद महाडकर यांचे आहे.

* कधी?- शनिवार, २९ ऑक्टोबर २०१६

* कुठे?- साठय़े महाविद्यालयाचे पटांगण, विलेपार्ले (पूर्व),

* केव्हा?- सकाळी सहा वाजता

स्वरभाव

‘स्वामीकृपा’तर्फे दिवाळी पहाटेच्या ‘स्वरभाव’ या कार्यक्रमात गायक आनंद भाटय़े व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत.

* कधी?- रविवार, ३० ऑक्टोबर २०१६

* कुठे?- रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी

* केव्हा?- सकाळी सात वाजता

‘सूर प्रभात’

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि रंगस्वरने ‘सूर प्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुचिस्मिता दास व पं. गणपती भट यांचे शास्त्रीय गायन या वेळी होणार आहे. त्यांना ओजस अधिया, श्रीधर मंदारे (तबला), सिद्धेश बिचोलकर, केवल कावले (संवादिनी) हे संगीतसाथ करणार असून सूत्रसंचालन रेखा नार्वेकर करतील.

* कधी?- शनिवार, २९ ऑक्टोबर २०१६

* कुठे?- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉइंट

* केव्हा?- सकाळी सात वाजता

स्वरांच्या मळ्यात

मराठी चित्रपट संगीतात दिवंगत पाश्र्वगायक जयवंत कुलकर्णी यांनी आपल्या नावाची आणि गायकीची स्वतंत्र नाममुद्रा उमटविली आहे. दादा कोंडके यांच्या ‘सोंगाडय़ा’ आणि सुरुवातीच्या काही चित्रपटांना जयवंत कुलकर्णी यांनीच ‘आवाज’ दिला होता. त्यांनी गायलेली ‘ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु’, ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’, ‘आमचा राजू का रुसला’, ‘सावध हरिणी सावध गं’, ‘निळे गगन निळी धरा’ ही ‘सोलो’ तर ‘माळ्याच्या माळ्यामंदी कोण गं उभी’, ‘हिल हिल पोरी हिला’ आणि अन्य द्वंद्वगीते आजही लोकप्रिय आहेत. ‘स्वरानंद’ संस्थेतर्फे जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या गाण्यांचा ‘स्वरांच्या मळ्यात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची संकल्पना किशोरी गोडबोले यांची असून निवेदन त्यांचे व अभिनेते अतुल परचुरे यांचे आहे. संगीता शेंबेकर, नंदेश उमप, किरण शेंबेकर, निहार शेंबेकर, सई गोडबोले हे गायक ही गाणी गाणार आहेत. सुराज साठे व अजय मदन यांचे संगीत संयोजन असून नीला रवींद्र यांचा कार्यक्रमात विशेष सहभाग असणार आहे.

* कधी?- शुक्रवार, २८ ऑक्टोबर २०१६

* कुठे?- दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले (पूर्व)

* केव्हा?- रात्री साडेआठ वाजता

ऋण शब्दांचे

केदार परुळेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यात लेखक, कवी, गायक, अभिनेता, जादूगार अशी अनेक रूपे सामावलेली आहेत. ई टीव्ही मराठीवरील ‘जंतर मंतर’ ही मालिका, पहिल्या ‘२०-२०’ क्रिकेट मॅचसाठी ‘एनडीटीव्ही’ वाहिनीसाठी ‘बोलक्या बाहुल्या’ंचा कार्यक्रम, काही खासगी आल्बममध्ये ‘गीतकार’ अशा अनेक रूपांत ते रसिकांसमोर आले आहेत. ते सध्या सादर करत असलेला ‘माईंड इट’ हा कार्यक्रमही लोकप्रिय आहे. रेकॉन समूहातर्फे परुळेकर यांच्या ‘ऋण शब्दांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात परुळेकर यांच्या कविता आणि गाणी सादर होणार असून स्वत: परुळेकर यांच्यासह अभिजित राणे, वृषाली पाटील हे गायक सहभागी होणार आहेत. निवेदन समीरा गुजर यांचे तर संगीत भगवंत नार्वेकर यांचे आहे. याच कार्यक्रमात परुळेकर लिखित ‘मनाच्या गाभाऱ्यातून’ या कथासंग्रहाचे प्रकाशनही होणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

* कधी?- शनिवार, २९ ऑक्टोबर २०१६

* कुठे?- यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा- पश्चिम (पश्चिम रेल्वे)

* केव्हा?- संध्याकाळी साडेपाच वाजता

बेगम अख्तर यांच्या गझल

दादरा, ठुमरी आणि गझल या प्रकारात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या गायिका बेगम अख्तर यांना ‘मल्लिका ए गझल’ असेही म्हटले जाते. ‘दिवाना बनाया है’, ‘मेरे हमनफास’, ‘ये ना थी हमारी किस्मत’ या आणि इतर अनेक गझला लोकप्रिय आहेत. बेगम अख्तर यांनी गायलेल्या या गझलांचे स्मरणरंजन एका कार्यक्रमातून रसिकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. अर्वाचिन क्रिएशन्सतर्फे एका मैफलीचे आयोजन करण्यात आले असून प्रगती म्हात्रे या बेगम अख्तर यांच्या निवडक गझल्स सादर करणार आहेत. संगीतप्रेमी रसिक आणि बेगम अख्तर यांच्या चाहत्यांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.

* कधी?- शुक्रवार, २८ ऑक्टोबर २०१६

* कुठे?- साठय़े महाविद्यालयाचे सभागृह, विलेपार्ले (पूर्व)

* केव्हा?- संध्याकाळी सात वाजता.

संकलन : शेखर जोशी

shekhar.joshi@expressindia.com

@ shejo66