केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठीचे अर्ज उपलब्ध झाले असून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी या परीक्षांमध्येही जागा राखीव असणार आहेत. या प्रवर्गासाठी साधारण ८९ जागा राखीव असण्याची शक्यता आहे.

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील उमेदवारांसाठीही यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इतर राखीव गटांबरोबर परीक्षेत (ईडब्ल्यूएस) वर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. लोकसेवा पूर्वपरीक्षेसाठीचे परीपत्रक आयोगाने जाहीर केले असून या परीक्षेचे अर्ज भरण्यासही सुरूवात झाली आहे. परीक्षेचे अर्ज १८ मार्चपर्यंत भरता येतील.