News Flash

राजकारणी, अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर वाहने

मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह वैधानिक, विशेष समित्या आणि प्रभाग समिती अध्यक्षांना मोटरगाडी देण्यात येते.

(संग्रहित छायाचित्र)

आठ वर्षांसाठी पालिकेकडून एक कोटी ६२ लाख रुपये खर्च

मुंबई : करोनामुळे खर्च जास्त आणि तुलनेने उत्पन्नात घट अशी परिस्थिती असताना मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने अधिकाऱ्यांना गाड्या देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची हालचाल सुरू केली आहे. शासन पुरस्कृत कंपनीकडून भाडेकरारावर गाड्या घेण्यासाठी निविदा मागविण्याची अट शिथिल करण्यासाठी स्थायी समितीची परवानगी मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह वैधानिक, विशेष समित्या आणि प्रभाग समिती अध्यक्षांना मोटरगाडी देण्यात येते. मात्र ही वाहने वारंवार बंद पडत असल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत होती. या प्रकाराचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले होते.

स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या वादळी चर्चेनंतर प्रशासनाने अतिमहत्त्वाचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर पाच टाटा नेक्सॉन इवी एक्स झेड प्लस विद्युत वाहने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांवर पालिकेचा जवळपास दुप्पट खर्च होणार आहे. एका गाडीचे वस्तू आणि सेवा करासह आठ वर्षांचे भाडे ३२ लाख ४८ हजार ६३२ रुपये इतके होणार आहे. पालिकेला आठ वर्षांसाठी पाच गाड्यांपोटी एक कोटी ६२ लाख ४३ हजार १६४ रुपये मोजावे लागणार आहेत. शासन पुरस्कृत ईईएलएस कंपनीकडून ही वाहने भाडेतत्त्वावर घेता यावीत यासाठी निविदा मागविण्याची अट शिथिल करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला आहे. या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निविदा प्रक्रिया नाही

शासन पुरस्कृत एनर्जी इफिशियन्सी सव्र्हिसेस लिमिटेड (ईईएलएस)ने विशेष सवलतीच्या दरात आठ वर्षांच्या भाडेकरारावर ही वाहने देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया न राबविता ईईएलएसकडून भाडेकराराने या गाड्या घेण्यात येत आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:15 am

Web Title: vehicles on lease for politicians officials akp 94
Next Stories
1 महिलेकडील मोबाइल खेचून पळ
2 उद्वाहन तंत्रज्ञांना ‘बस’ प्रवासास परवानगी
3 बेस्ट कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा
Just Now!
X