कथन साहित्याचा शिलेदार
कथन साहित्य हरवत चालले आहे आणि अकथनात्मक साहित्याला मागणी आणि किंमत वाढली आहे, अशा तथाकथित गळेकाढू चर्चा कितीही दिवस सुरू आहे. विविध रसपरिपोष करणाऱ्या कथनात्मक वा ललित mu03साहित्याचा उत्तम खजिना घेऊन येणाऱ्या ‘नवल’ या अंकाकडे पाहिले की त्या चर्चाचा फोलपणा लक्षात येतो. यंदाही भूतकथा, गूढकथा, भयकथा, युद्धकथा आणि अद्भूतकथा असे कप्पे असले, तरी ‘नवल’मधील घटनाप्रधान आणि कुतूहलपूर्ण कथा साहित्यप्रेमींसाठी वार्षिक मेजवानी आहे. महाभारतातील पात्राला आजच्या काळात अनुसरून सत्यजीत रे यांनी लिहिलेल्या खगम या कथेपासून रोआल्ड डाल यांच्या गाजलेल्या कथेपर्यंत दर्जेदार अनुवादित कथा वाचायला मिळतात. १९५५ च्या अंकातील श्री. म. माटे यांची पुनर्मुद्रित सत्यकथा आनंद देणारी आहे. पुरुषोत्तम रामदासी, जयश्री कुलकर्णी यांनी गूढकथांचा विभाग सांभाळला आहे, तर वसु भारद्वाज यांची भयकादंबरी लक्षणीय आहे.
नवल, संपादक: आनंद अंतरकर, पृष्ठे २००, किंमत, २५० रु.

सर्वोत्तम ऑनलाइन दिवाळी अंक
दिवाळी अंकांच्या घाईच्या साहित्यिक व्यवहारात अपेक्षांना पूर्ण करणारे किंबहुना अपेक्षांहून अधिक दर्जेदार mu04साहित्य मिळाले तर पट्टीच्या वाचकांना सुखद सांस्कृतिक धक्का मिळतो. यंदा तो धक्का ‘ऐसी अक्षरे’च्या ऑनलाइन दिवाळी अंकाने दिला आहे. ‘चळवळ’ या संकल्पनेला मध्यवर्ती करून आजच्या घडीच्या दर्जेदार लेखकांची फळीच या अंकाने चर्चेसाठी उतरविली आहे. आनंद करंदीकर, राजीव साने, मुग्धा कर्णिक, नंदा खरे, मिलिंद मुरुगकर, सुनील तांबे आदींच्या सडेतोड विचारांची मौज वाचकांना लुटता येऊ शकते. एकाच मानसिक दृष्टचक्रात अडकलेल्या मराठी प्रवृत्तीचे विच्छेदन गिरीश कुबेर यांच्या मुलाखतीमधून आले आहे. याशिवाय ललित विभागामध्ये अवधूत डोंगरे यांच्या आगामी कादंबरीचे प्रदीर्घ प्रकरण विशेष आकर्षण ठरले आहे. फारएण्डची मुलाखत हे चित्रपट समीक्षेची गंभीर विनोदी उडविणारे प्रकरणही सुंदर आहे. ऐसी अक्षरेसारख्या दर्जेदार प्रयत्नांमुळे फोरम आणि नेटकट्टय़ांवरून स्वतंत्र संकल्पना देणारे व नवविचारांच्या पताका लावणारे ऑनलाइन अंक मुख्य धारेतील वाचकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.
ऐसी अक्षरे, ऑनलाइन दिवाळी अंक, संपादक, संहिता जोशी आणि मंडळी. http://aisiakshare.com/diwali14 या संकेतस्थळावर मोफत.

वेगळ्या वाटाडय़ांची महती
चैत्राली वार्षिकच्या दिव्य अलौकिक विशेषांकाच्या संकल्पनेत साहित्य, निसर्ग, अध्यात्म, चित्रपट, नाटय़ व mu06जीवनातील असाधारण घटनेत भावलेले विशेषत्व शब्दबद्ध केले आहे. डॉ. माधव पोतदार यांचा काव्यात्मक लेख, डॉ. माधुरी कोरान्ने यांनी जयवंत दळवी यांच्या संध्याछाया या नाटय़कृतीचा घेतलेला वेध. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संघर्षमय जीवन श्यामकांत कुलकर्णी यांनी रेखाटले आहे. लेखक श्री. म. माटे यांची ‘बन्सीधर तू आता कुठे जाशील?’ ही कथा, अभिनेते राज कपूर व गुरुदत्त यांच्यावरील शरद कोरडे व माधव पुराणिक यांचा निसर्गावरील लेख तसेच अंजली बापट यांचे वर्णन भावते.
चैत्राली, संपादक रमेश द. पाटील पाने-१६० किंमत- १२५ रु.

मनोविकासक साहित्याचा पुरवठा
मायाजाmu06लाने सुरुवातीच्या पिढीला कुतूहल दिले, पुढच्या पिढीला आकर्षण दिले आणि आताच्या पिढीला बेसुमार बधिरपणा दिला. इंटरनेटच्या फायद्या-तोटय़ांपलीकडे त्याची आज माणसाला व्यापणारी गरज आणि त्यातून जगण्याच्या बनलेल्या समस्या आदींवर मनोविकास प्रकाशनाच्या ‘इत्यादी’ने प्रकाश टाकला आहे. अतुल कहाते, अभिजित रणदिवे, मिलिंद पोतदार आदींनी ‘नेट’वर्क यातून अचूक निरीक्षणे नोंदविली आहेत. नाती दुरावताना या अंकाच्या दुसऱ्या विभागात यशोधरा काटकर, नीला भागवत आणि रामदास भटकळ यांचे लेख, गणेश मतकरी यांच्या कथेसोबत चेतन डांगे, विजया राजाध्यक्ष  पिढीच्या उत्तम कथा अंकात आहेत. 
इत्यादी, संपादक : आशीष पाटकर, पृष्ठे २००, किंमत १४०रु.