News Flash

कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

सचिन वाझे प्रकरणात आरोपांचा रोख वळलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर या पदावरून बदली करण्यात आली असून त्या जागेवर राज्यातील एक वरीष्ठ IPS अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती मुंबई पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून यामध्ये सीआययूचे अधिकारी सचिन वाझे सहभागी असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांना निलंबित केल्यानंतर त्यांचे वरीष्ठ असलेले परमबीर सिंग यांना देखील पदावरून हटवण्याची मागणी केली जात होती. या संपूर्ण प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने टीका केली गेल्यानंतर राज्य सरकारकडून परमबीर सिंग यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आलेले हेमंत नगराळे हे देखील डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. पण नेमके हेमंत नगराळे कोण आहेत?

केतन पारेख प्रकरणाचा तपास!

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रवतीचे आहेत. १९८७च्या बॅचचे ते पोलीस अधिकारी आहेत. १९९८ ते २००२ या चार वर्षांच्या काळात नगराळे यांनी आधी सीबीआयचे एसपी आणि नंतर डीआयजी म्हणून काम पाहिलं आहे. याच काळात त्यांनी १३० कोटींचा आर्थिक घोटाळा झालेले प्रसिद्ध केतन पारेख प्रकरण, शेअर बाजारातील विख्यात घोटाळा ठरलेल्या ४०० कोटींच्या हर्षद मेहता घोटाळा आणि तब्बल १८०० कोटींच्या माधोपुरा कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याचा तपास केला आहे.

२६/११ चा मुंबई हल्ला!

२००८मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यावेळी हेमंत नगराळे हे MSEDCL चे स्पेशल इन्स्पेक्टर जनरल होते. फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार हल्ल्यावेळी नगराळे हॉटेल ताजमध्ये शिरले आणि त्यांनी जखमी आणि मृतांना बाहेर काढण्याची जबाबदारी पार पाडली. तसेच, यानंतर नगराळे यांनी ताजमध्ये ठेवण्यात आलेली RDX ने भरलेली बॅक स्वत: बाहेर काढून सुरक्षित स्थळी ठेवली आणि नंतर बॉम्ब स्क्वॉडला पाचारण केलं.

यााधीही मुंबईचे पोलीस आयुक्त!

हेमंत नगराळे यांनी याआधी २०१४मध्ये काही काळासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. तसेच, मुंबई पोलिसात देखील त्यांनी याआधी काही महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये ते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त देखील राहिले आहेत. नुकतीच ७ जानेवारी २०२१ रोजी हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली होती.

पत्नीनेच केली होती पोलिसात तक्रार!

दरम्यान, हेमंत नगराळे यांच्याविरोधात त्यांच्याच पत्नीने तक्रार केल्याचा देखील प्रकार घडला होता. २००९मध्ये या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणी देखील झाली होती. यामध्ये हेमंत नगराळे यांच्या पत्नी प्रतिमा नगराळे यांनी नगराळेंविरोधात आपल्या नावावर बँक अकाऊंट सुरू करून त्याचा वापर बेनामी व्यवहार करण्यासाठी केल्याचा आरोप केला होता. पुढे डिसेंबर २०१०मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळून लावले होते.

अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली; हेमंत नगराळे नवे पोलीस आयुक्त!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 6:12 pm

Web Title: who is hemant nagrale appointed mumbai police commissioner on parambir singh sachin vaze case pmw 88
Next Stories
1 सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास मी नकार दिला होता – देवेंद्र फडणवीस
2 मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीवर संजय राऊत यांचं पहिलं ट्विट, म्हणाले…
3 अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली; हेमंत नगराळे नवे पोलीस आयुक्त!
Just Now!
X