शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कंपन्यांकडून विविध उपक्र म

मुंबई : करोनाकाळात कर्मचाऱ्यांचे घरून कार्यालयीन काम करणे सुलभ व्हावे यासाठी आयटी, व्यवस्थापन, वित्त क्षेत्रातील कं पन्यांकडून आपल्या क र्मचाऱ्यांना विशेष भत्ते, सुविधा देऊ के ल्या जात आहेत. यात  इंटरनेट, संगणक, लॅपटॉप, इतर वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्याकाठी ठरावीक रकमेचा समावेश आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी प्रश्नमंजूषा, कोडी सोडवणे, यासारख्या स्पर्धा, मानसोपचारांचे मार्गदर्शन सत्र हे उपक्र मही आयोजित के ले जात आहेत.

राज्य सरकारने टाळेबंदी शिथिल करताना खासगी कार्यालयात ३३ टक्क्यांपर्यंत उपस्थितीला मान्यता दिली. तरीही अनेक बहुराष्ट्रीय कं पन्यांनी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षांपर्यंत घरातूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. घरून काम करणे सुकर व्हावे यासाठी कं पन्यांनी इंटरनेट तसेच खुर्ची, टेबल हे कार्यालयीन साहित्य खरेदी करण्यासाठी विशेष भत्ता दिला आहे. तसेच घरून काम करताना येणारे ताणतणाव, एकसुरीपणा टाळण्याकरिता कर्मचाऱ्यांना दर आठवडय़ाला कर्मचाऱ्यांच्या बुद्धीला खाद्य देणारे उपक्र म तसेच मनोरंजनासाठी विविध स्पर्धाही आयोजित के ल्या जात आहेत.

ऋषिके श मराठे हे एका सॉफ्टवेअर कं पनीत माहिती-तंत्रज्ञान अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ‘आम्हाला कं पनीकडून इंटरनेटसाठी दर महिन्याला ७५० रुपये देण्यात येतात. याशिवाय घरून काम करण्यासाठी पंधरा हजार रुपयांपर्यंतचे आवश्यक साहित्य घेण्याची मुभा देण्यात आली आहे. नुकतीच मी खुर्ची खरेदी केली,’  असे त्यांनी सांगितले. याचबरोबर या पाच महिन्यांत कं पनीतर्फे  मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि लहान मुलांसाठी गायन आणि नृत्य स्पर्धाही आयोजित के ल्या असल्याचे ऋषिके शने स्पष्ट केले.

एका खासगी कं पनीत काम करणारा अखिलेश सावंत हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीच्या व्यवस्थापनाचे काम करतो. हे काम करण्यासाठी त्याला अतिशय वेगवान इंटरनेटची गरज भासते. कं पनीतर्फे  दर महिन्याला इंटरनेटसाठी २५०० रुपये दिले जातात. करोनाकाळात त्याच्या कं पनीतर्फे  वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जात आहेत. ‘कर्मचारी किरकोळ आजारी पडल्यास ते दिवस वैद्यकीय सुट्टी म्हणून ग्राह्य़ धरले जात नाहीत. तसेच करोनाबाधित कर्मचाऱ्याला २८ दिवस सुट्टी दिली जाते, असेही तो सांगतो.

इतर वेळी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा प्रवास आणि प्रोत्साहन भत्ता घरून काम करण्यासाठी वापरला जात आहे. गरज पडल्यास आम्ही कर्मचाऱ्यांना डोंगल, इंटरनेट, तसेच मोबाइलच्या बिलाचे पैसेही देत असल्याची माहिती एका कंपनीत एचआर विभागात काम करणाऱ्या दिशा पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

साहित्य खरेदीसाठी अर्थपुरवठा

विविध कंपन्यांतर्फे घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना  इंटरनेट, खुर्ची, टेबल हे कार्यालयीन साहित्य खरेदीसाठी भत्ता दिला जातो. इंटरनेटसाठी दरमहा ७५० ते २५०० रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जातात. आजारी पडल्यास ते दिवस वैद्यकीय सुट्टी म्हणून ग्राह्य़ धरले जात नाही. करोनाबाधित कर्मचाऱ्याला २८ दिवस सुट्टी दिली जाते.  अनेक बहुराष्ट्रीय कं पन्यांनी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षांपर्यंत घरातूनच काम करण्याची परवानगी दिली आहे.