विशेष सत्रात आज शिक्षक, विद्यार्थ्यांना लाभ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर सोमवारी आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या विशेष सत्रामध्ये १ लाख १३ हजार महिलांचे लसीकरण केले गेले.

महिलांचे लसीकरण मोठय़ा प्रमाणात करण्यासाठी पालिकेतर्फे सोमवारी विशेष सत्राचे आयोजन केले होते. यात पालिकेच्या आणि शासकीय सर्व केंद्रावर पूर्वनोंदणी न करता पहिली आणि दुसरी मात्रा घेण्याची सुविधा महिलांसाठी खुली केली होती. या अंतर्गत शहरातील १ लाख १३ हजार ९३५ महिलांना लस देण्यात आली.

पालिकेने दुसऱ्यांदा महिलांसाठी विशेष लसीकरण आयोजित केले होते.

आज शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण

शाळा सुरू होण्याच्या पाश्र्वभूमीवर आज सकाळी नऊ ते दुपारी दोन या सत्रामध्ये शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील विद्यार्थ्यांंच्या लसीकरणासाठी विशेष सत्र राबविण्यात येणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांंना संबंधित शिक्षण संस्थेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

दुपारनंतर दुसऱ्या मात्राधारकांचे लसीकरण

दुपारी तीन ते रात्री आठ या सत्रामध्ये सर्व केंद्रावर केवळ दुसऱ्या मात्राधारकांसाठी लसीकरण आयोजित केले जाणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही पहिली मात्रा दिली जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबईत रुग्णसंख्येत घट

’सोमवारी मुंबईत ३७७ नवे करोना रुग्ण आढळले, तर सात करोनाबाधितांचा मृत्यू झाला. सोमवारी नव्याने सापडलेल्या करोना रुग्णांमुळे बाधितांची एकू ण संख्या ७ लाख ४१ हजार ६१७ झाली आहे.

’सोमवारी ३३४ रुग्ण बरे झाल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख १८ हजार ३३६ झाली आहे. सध्या मुंबईत ४ हजार ७०२ उपचाराधीन रुग्ण आहेत.

’मृत्यू झालेल्यांपैकी पाच रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तसेच मृतांध्ये चार पुरूष व तीन महिला होत्या. सहा रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के  आहे. 

’रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार १८९ दिवसांवर पोहोचला आहे. सोमवारी मुंबईत ३० हजार ६९२ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकू ण एक कोटी दोन लाख ४७ हजार ६६४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

’५२ इमारती प्रतिबंधित आहेत तर बाधितांच्या संपर्कातील २ हजार ३५६ नागरिकांचा शोध सोमवारी घेण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 lakh 13 thousand women vaccinated in mumbai zws
First published on: 28-09-2021 at 04:29 IST