मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला सव्वादोन वर्षे पूर्ण होत असताना बुधवारी या सरकारची १००वी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि त्याच रात्री सह्याद्री अतिथीगृहावर पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यात रायगड सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला होता. गेल्या सव्वादोन वर्षांत अशा ९९ मंत्रिमंडळ बैठका पार पडल्या असुून बुधवारी होणारी मंत्रिमंडळ बैठक ही महाविकास आघाडी सरकारची १००वी मंत्रिमंडळ बैठक असणार आहे.