मुंबई आणि परिसरात बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरूच असून गेल्या १५ दिवसांत १६५ बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेअंतर्गत असलेल्या शाखेने केलेल्या कारवाईत हे घुसखोर बांगलादेशी आढळून आले आहेत.
गेल्या १५ दिवसांत या शाखेने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार धाडसत्र सुरू केले होते. त्यात विरारमधून ९४ तर नवी मुंबई परिसरातून ७२ बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. चालू वर्षांत या शाखेने बांगलादेशींविरोधात एकूण १३६ गुन्हे दाखल करुन दीड हजार बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास सोनावणे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.