नेरुळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शनिवारी संध्याकाळी सुमारे 200 मुलं आणि त्यांचे पालक मोठ्या आनंदात दिसत होते. हसणं-खिदळण, धावणं-बागडण, सर्वांचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. तुम्ही म्हणाल, यात विशेष काय? विशेष हेच की, ही सर्व मुलंच ‘विशेष’ होती. ऑटिझम-स्वमग्नता हा विकार जन्मतः असलेली ही मुलं आणि त्यांच्या पालकांच्या जीवनात ही आगळीवेगळी-आनंदी संध्याकाळ आणली होती, नवी मुंबईतल्या ‘चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’च्या डॉ. सुमीत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱयांनी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक जन्मस्थ अवस्था आहे. अशी व्यक्ती-मुलं आपल्याच विश्‍वात आणि विचारात रममाण असतात. ऑटिझमबाबत जनजागरूकता आणि सर्वांगीण उपचार करणाऱ्या ‘चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’ या संस्थेने ऑटिझमग्रस्त मुलांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी अनेक नवनव्या थेरपींचा अवलंब केला आहे. याअंतर्गत शनिवारी सुमारे 200 स्वमग्न मुलांना डॉ. आंबेडकर उद्यानात ग्रुप थेरपी दिली गेली. अशा “ग्रुप थेरपीमुळे या मुलांच्या मनातील भीती चेपून त्यांच्यात समाजात, लोकांमध्ये मिसळण्याची आणि संवाद साधण्याची कौशल्ये विकसित होण्यास मदत होते” असं ‘चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’चे संस्थापक डॉ. सुमीत शिंदे यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 students group therapy in nerul
First published on: 25-02-2019 at 18:54 IST