मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रो रेल्वेची कामे सुरू असून या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांनी मुंबई महानगरपालिकेचा तब्बल ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर थकवला आहे. थकीत मालमत्ता कर भरावा याकरीता पालिका प्रशासनाने मेट्रोच्या चार कंत्राटदारांना गेल्या आठवड्यात नोटीस बजावली आहे. या कंत्राटदारांबरोबरच आणखी पाच मोठ्या थकबाकीदारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईत विविध ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. कास्टींग यार्ड भूखंडाचा मालमत्ता कर भरलेला नसल्यामुळे पालिका प्रशासनाने ही नोटीस बजावला आहे. करारनाम्यानुसार हा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या एचसीसी – एमएमसी, मेसर्स सीईसी – आयटीडी, मेसर्स डोगा सोमा आणि मेसर्स एल. ॲण्ड टी. स्टेक या कंत्राटदारांवर महापालिकेने नोटीस बजावली आहे. महापालिकेने १९ मार्च रोजी या नोटीस बजावल्या असून विहीत कालावधीत मालमत्ता कर भरावा म्हणून करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मेट्रोच्या कंत्राटदारांबरोबरच अन्य मोठ्या मालमत्ताधारक थकबाकीदारांनाही पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

Mumbai, parks, misused, mnc,
मुंबई : १२ उद्यानांचा गैरवापर होत असताना पालिकेची डोळेझाक
mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
road work contractor marathi news, mumbai municipal corporation marathi news
मुंबई: शहर भागातील कामे रखडवणाऱ्या कंत्राटदाराकडून अद्याप दंड वसुली नाही, एक महिन्याची मुदत संपूनही मुंबई महापालिकेची चालढकल
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवलेला मालमत्ता कर

१) मेसर्स एचसीसी – एमएमसी (एफ उत्तर विभाग) – ९८ कोटी ९२ लाख ४१ हजार २४१ रुपये

२) मेसर्स डोगा सोमा (एफ उत्तर विभाग) – ९४ कोटी ३९ लाख ८१ हजार ४२१ रुपये)

३) मेसर्स एल ॲण्ड टी स्टेक (एफ उत्तर विभाग) – ८२ कोटी १२ लाख ८४ हजार ७१४ रुपये

४) मेसर्स एचसीसी – एमएमसी (एफ उत्तर विभाग) – ४ कोटी ७ लाख ६३ हजार ४१९ रुपये

५) मेसर्स सीईसी – आयटीडी (एफ उत्तर विभाग) – ९५ कोटी ६० लाख ७ हजार ४४३ रुपये

अन्य थकबाकीदार

१) निर्मल लाईफस्टाईल (टी विभाग) – ४० कोटी ६५ लाख ८३ हजार ७८५ रुपये

२) जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (पी उत्तर विभाग) – १६ कोटी ३० लाख २५ हजार ४३२ रुपये

३) रॉयल रिअॅलिएटर्स (पी उत्तर विभाग) – ४ कोटी ४४ लाख ४८ हजार १२० रुपये

४) विधी रिअॅलिएटर्स (पी उत्तर विभाग) – १६ कोटी ९५ लाख ८ हजार ९१९ रुपये

५) राधा कन्स्ट्रक्शन (पी उत्तर विभाग) – २ कोटी ९० लाख ७४ हजार ३८७ रुपये