मुंबईत गुरुवारी दिवसभरात ४६३ करोनाबाधित आढळले, तर पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बधितांची संख्या ३ लाख १० हजार ५९७; तर करोनाबळींची

संख्या ११ हजार ३७८ इतकी झाली आहे.

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. सध्या मुंबईत केवळ पाच हजार ४८९ रुग्ण उपचाराधीन असून त्यापैकी केवळ दीड हजार रुग्णांना लक्षणे आहेत. ३८०० रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. गंभीर रुग्णांची संख्या कमी होऊन २६२ झाली आहे. आतापर्यंत दोन लाख ९२ हजारांहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

करोनाबाबत बेफिकीरी नको -मुख्यमंत्री

लसीकरण वेगाने सुरू आहे. परंतु ब्रिटन, ब्राझीलमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे ते पाहता आपण अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बठकीत करोना सादरीकरणाच्यावेळी सांगितले.