मुंबई: मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर जुलै महिन्यात ५४ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची चार हजार ९४ बनावट ओळखपत्रेही जप्त केली आहेत.

१ जुलै ते २८ जुलै २०२१ मध्ये ५४ हजार १२० विनातिकीट उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून एक कोटी ८० लाख रुपयांचा दंड वसूल केला. एप्रिल २०२१ मध्ये २८ हजार ९१० विना तिकीट प्रवाशांवर कारवाई झाली होती. त्यानंतर मे  मध्ये हीच संख्या ३२ हजार ९०७ आणि जूनमध्ये ४० हजार ५२५ एवढी झाली.

एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत ४ हजार ९४ बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत.