मुंबई : कल्याण शिळफाटा ते भिवंडी या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्यासाठी ५६१ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ( एमएसआरडीसी) हा निधी देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण शिळफाटा ते भिवंडी या २१ कि.मि. लांबीच्या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रकल्प अहवालानुसार उड्डाणपुल, रेल्वेवरील पुल, पुलाचे पोचमार्ग, जंक्शन सुधारणा, सूचना फलके व तत्सम अनुशंगिक कामासाठी ३८९ कोटी ६३ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु कल्याण शहरातील रेल्वे पत्री उड्डाण पुलाच्या कामात झालेली वाढ, तसेच रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी क्रांक्रीटीकरणाने सहापदरी रुंदीकरण करणे, इतर नवीन कामांची भर पडल्यामुळे तसेच बांधकाम खर्चात वाढ झाल्याने प्रकल्पाचा एकूण खर्चही वाढला आहे. त्यास मान्यताद्यावी, असा प्रस्ताव एमएसआरडीसीने राज्य शासनाकडे पाठविला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 561 crore increased cost bhiwandi kalyan shilphata road approved ysh
First published on: 30-08-2022 at 00:59 IST