‘महावितरण’मध्ये सरळसेवा भरतीद्वारे ६९० कनिष्ठ सहायक पदांची भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांना दरमहा आठ हजार इतके वेतन मिळणार आहे. निवडीनंतर तीन वर्षांचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना निम्नस्तर लिपिक या नियमित पदावर घेतले जाणार आहे.
कनिष्ठ सहायकपदासाठी ‘बी. कॉम’ची पदवी आणि संगणकाचे ज्ञान ही आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी आठ हजार, दुसऱ्या वर्षी नऊ हजार तर तिसऱ्या वर्षी दहा हजार रुपये वेतन मिळेल. ज्या यशस्वी उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असेल, वेगळी पदविका असेल तर त्यांना एक हजार रुपये वाढीव वेतन मिळेल.
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०१४ आहे. जाहिरातीमधील निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे बहुपर्यायी ऑनलाइन परीक्षा २२ आणि २३ जानेवारी २०१४ रोजी राज्यात विविध केंद्रांवर होईल. या भरतीची तपशीलवार माहिती ‘महावितरण’च्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2013 रोजी प्रकाशित
‘महावितरण’मध्ये ६९० कनिष्ठ सहायकपदांची भरती
‘महावितरण’मध्ये सरळसेवा भरतीद्वारे ६९० कनिष्ठ सहायक पदांची भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांना दरमहा आठ हजार इतके वेतन मिळणार आहे.
First published on: 30-12-2013 at 02:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 690 junior assistant posts recruitment in mahavitaran