मुंबई : पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या २,४१७ घरांच्या दुरुस्तीच्या कामाला म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेग दिला आहे. आतापर्यंत घरांच्या दुरुस्तीची ७० टक्के कामे पूर्ण झाली असून ५०० घरे वितरणासाठी सज्ज आहेत. दिवाळीनंतर अवघ्या काही दिवसांत या घरांची संपूर्ण रक्कम भरलेल्या ५०० कामगारांना घरांचा ताबा दिला जाणार आहे, त्यांना चावीचे वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा – पक्षादेश मिळालाच नाही! विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत एकनाथ शिंदे यांचा दावा

Take concrete steps to house remaining mill workers demand of mill workers on Labor Day
मुंबई : उर्वरित गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठोस पावले उचला, कामगार दिनी गिरणी कामगारांची मागणी
Big fluctuations in the shares of two private sector banks in the capital market
बँकांच्या भागधारकांना अनोखी अनुभूती; कुणा वाट्याला आनंद, कुणा पदरी दुःख!
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

हेही वाचा – रवींद्र वायकर यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई मंडळाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील कोनमधील २,४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढली होती. मात्र या सोडतीतील घरांचा ताबा अद्याप कामगारांना मिळालेला नाही. विविध कारणांमुळे आणि दुरुस्तीच्या वादामुळे घरांचा ताबा देणे रखडले होते. पण आता मात्र दुरुस्तीचे काम मार्गी लागले असून नुकतीच या कामाची पाहणी गिरणी कामगार सनियंत्रण समितीने केली. त्यानुसार आतापर्यंत दुरुस्तीचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी दिली. तर ५०० घरांची दुरुस्ती पूर्ण झाली असून संबंधितांना दिवाळीनंतर पाच-सहा दिवसांत या घरांचा ताबा दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. परिणामी, ५०० कामागरांच्या हक्काच्या घरांची प्रतीक्षा संपणार आहे.