मुंबई : यंदा गणेशोत्सवनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी मध्य रेल्वेने ७४ विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर येथून सावंतवाडी, कुडाळ, मडगांवसाठी या गाड्या धावण्यात येणार आहेत. या गाड्यांचे तिकीट आरक्षण ४ जुलैपासून सुरु होणार आहे.

ऑगस्ट अखेरीस गणेशोत्सव सुरू होणार आहे. दोन वर्षे करोनामुळे गणेशोत्सवाचा उत्साह काहिसा कमी होता. यंदा मात्र निर्बंध नसल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी अधिक असण्याची शक्यता आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे गेल्या महिन्यातच बंद झाले. त्यामुळे आता रेल्वेने अधिक गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

गाड्या कोणत्या?

१. मुंबई – सावंतवाडी दररोज  विशेष फेरी (एकूण ४४ फेऱ्या)

०११३७  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर पर्यंत दररोज मध्यरात्री  १२ वाजून.२० मिनिटांनी सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दुपारी २ वाजता  पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०११३८ सावंतवाडी रोड येथून  २१ ऑगस्ट  ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी २.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता पोहोचेल. २. नागपूर – मडगाव द्विसाप्ताहिक विशेष फेरी (१२ फेऱ्या)