scorecardresearch

Coronavirus : उपचाराधीन रुग्णांत घट

मुंबईत दिवसभरात ८५८ करोना रुग्ण

Coronavirus : उपचाराधीन रुग्णांत घट

मुंबईत दिवसभरात ८५८ करोना रुग्ण

मुंबई/ ठाणे : मुंबईत गुरुवारी ८५८ करोनाबाधितांची नोंद झाली, तर १९ जणांचा मृत्यू झाला. करोनामुक्त होण्याचा दर ९० टक्क्यांवर गेल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रथमच साडेअकरा हजारापर्यंत खाली आली आहे.

मुंबईतील रुग्णसंख्यावाढीचा दर घसरत असून, सध्या तो ०.२९ टक्के इतका आहे. गुरुवारी ८५८ नवीन रुग्ण आढळल्यामुळे एकूण रुग्णसंख्या २,६७,६०४ वर पोहोचली. तर एका दिवसात २,१७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २,४१,९७५ म्हणजेच ९० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर दुबार रुग्णांची नावे व मुंबईबाहेरील रुग्णांची नावे कमी केल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सध्या केवळ ११,५३१ रुग्ण उपचाराधीन आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ५४० नवे बाधित

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी ५४० करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख १८ हजार इतकी झाली आहे. दिवसभरात ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ५ हजार ५०१ इतकी झाली आहे.

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांपैकी सात हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. सुमारे चार हजार रुग्णांना लक्षणे आहेत.

राज्यात ४४९६ नवे रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत ४४९६ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, १२२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १७ लाख ३६ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५,६८२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ८४,६२७ जण उपचाराधीन आहेत.

देशात २४ तासांत ४७,९०५ रुग्ण

देशात गुरुवारी ४७ हजार ९०५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येने ८६ लाख ८३ हजार ९१६चा टप्पा गाठला आहे. करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८० लाख ६६ हजार ५०१ इतकी झाली आहे. दिवसभरात ५५० जणांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या एक लाख २८ हजार १२१ इतकी झाली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाख ८९ हजार २९४ इतकी आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या