मुंबई : आंब्याच्या झाडावरून पडून एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी चेंबूर परिसरात घडली. याबाबत चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा – मुंबई : क्षयरोग रुग्णालयात १० नवीन अतिदक्षता खाटा
काही वर्षांपूर्वी आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे प्रेम गवळी (१४) आजीसोबत चेंबूरच्या कोकण नगर परिसरात वास्तव्यास होता. प्रेम शुक्रवारी सायंकाळी मित्रांसोबत भक्ती भवन परिसरात फिरायला गेला होता. आंबे काढण्यासाठी तो तेथील एका झाडावर चढला होता. त्याच वेळी तोल जाऊन तो झाडावरून खाली पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. आसपासच्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.