मुंबई: रे रोड येथे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ३१ वर्षीय मजुराची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकू व लोखंडी पाइपने मारून मजुराची हत्या करण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी भायखळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

राजेश कुमार साकेत असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. रे रोड, भायखळा पूर्व येथील तांबावाला लेन परिसरातील एटलास मिल कंपाउंड परिसरात सध्या बांधकाम सुरू आहे. तेथील तळमजल्यावर मंगळवारी साकेतचा मृतदेह सापडला. साकेत बांधकाम ठिकाणीच वास्तव्याला होता. हत्येबाबतची माहिती मिळाल्यानंतर भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर पोलीस हवालदार मुरलीधर गवळी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai, Dead bodies of two children,
मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय
uncle rapes 18 Yr old niece in panvel
पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाचा पुतणीवर अत्याचार, आरोपीला अटक
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू

हेही वाचा – “महिला आरक्षण पूर्णपणे जुमलेबाजी”, विधेयक मांडताना संसदेत घडलेला किस्सा सांगत सुप्रिया सुळेंचा मोठा आरोप

हेही वाचा – गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महागणार

प्राथमिक पाहणीत साकेतचा गळा चाकूने चिरण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याला लोखंडी पाइपने मारहाणही करण्यात आली आहे. साकेतच्या डोक्यावरही मारहाणीची गंभीर जखम होती. हत्येत वापरण्यात आलेला लोखंडी पाइप घटनास्थळवरून जप्त करण्यात आला. दरम्यान, हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.