scorecardresearch

Premium

अ. र. अंतुले यांची प्रकृती गंभीर; आर. आर. पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया

राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली.

अ. र. अंतुले यांची प्रकृती गंभीर; आर. आर. पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया

राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली. अंतुले यांना मूत्रपिंडाचा त्रास असून, सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि राज्याचे पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी रुग्णालयात जाऊन अंतुले यांच्या प्रकृतीची चौकशी केली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तोंडात सूज आल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल, रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

complaints against Guardian Minister suresh khade
पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात भाजपच्याच बैठकीत तक्रारींचा पाढा
Devendra Fadnavis, Sanjay Raut, Sanjay Rauts statement, Devendra Fadnavis criticized Sanjay Raut
“संजय राऊत यांच्या पक्षात कोण मदारी आणि कोण बंदर, हे त्यांनाच ठाऊक” देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
eknath shinde flag off shetkari samvad yatra
शेतकरी संवाद यात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शुभारंभ; ठाण्यातील टेम्भी नाका येथून प्रारंभ
Jagan Mohan Reddy and Chandrabbau Naidu
चंद्राबाबू यांच्या अटकेनंतर तेलगू देसम पक्षाच्या सर्व २१ आमदारांना गृहकैद, राज्यभर पोलिस तैनात

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A r antulay condition critical and r r patil admitted to hospital

First published on: 25-11-2014 at 03:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×