देशाच्या आर्थिक राजधानीत तब्बल १४७९ कोटींची जागा खरेदीची ‘बिग डील’ गुरूवारी झाली. अॅबॉट इंडिया या फार्मास्युटिकल कंपनीने मुंबईतील वांद्रा-कुर्ला संकुलात(बीकेसी) ४,३५,००० चौरस फुटांची मोक्याची जागा खरेदी केली असून त्यासाठी एकूण १४७९ कोटी मोजले आहेत. ही जागा गोदरेज प्रॉपर्टीज आणि जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडने संयुक्तरित्या विकसित केली आहे. हा प्रकल्प २०१६ च्या मध्यापर्यंत पूर्ण होणार. त्यानंतर अॅबॉट इंडिया कंपनीचे या जागेत स्थलांतर होईल. मुंबईतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी व्यावसायिक रिअल इस्टेट डील असल्याचा दावा गोदरेज प्रॉपर्टीने केला आहे. तर, बीकेसी येथील गोदरेजच्या न्यु कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याची अॅबॉट कंपनीची योजना आहे. त्यामुळे कंपनीचे कार्यालय एकाच ठिकाणी राहावे असा या सौद्यामागचा हेतू असल्याचे अॅबॉट कंपनीकडून सांगण्यात आले आहे.