मुंबईत सेवांतर्गत प्रशिक्षण दरम्यान बेपत्ता झालेल्या जवानांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मीरारोड ते दहिसर या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुपेंद्र सिंग टोकस असं या जवानाचे नाव आहे. लुधियाना युनिट येथे हा लष्करी जवान कार्यरत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच सेवांतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या कुलाबा येथील नेव्ही नगर युनिट मध्ये आला होता. ३० नोव्हेंबर रोजी कुलाबाच्या नेव्ही नगर युनिट मधून तो पुन्हा आपल्या सेवेत रुजू होण्यासाठी निघाला होता. मात्र चार दिवसांनंतरही काही त्याचा पत्ताच नसल्याने कफपरेड पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर ६ डिसेंबर रोजी भुपेंद्र सिंग टोकसचा मृतदेह दहिसर व मिरारोड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांना आढळून आला. टोकसजवळ असलेल्या बॅगेत तपासणी केली असता पोलिसांना बेपत्ता असलेल्या जवानाची ओळख पटली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांद्रे-गाझीपूर एक्सप्रेसच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या घटनेची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी सांगितले आहे.