‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या माध्यमातून अचूक सल्ला
२८,००० खालील पडझड नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने पुन्हा एकदा झेप घेतली आहे. वस्तू व सेवाकर विधेयकामुळे करविषयक तर्क-वितर्क वाढले आहेत. स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांबरोबरच मौल्यवान धातू, स्थावर मालमत्तांच्या परताव्याबाबत शंका उत्पन्न होत आहेत. अशा स्थितीत गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती व त्यासाठी अचूक सल्ला काय? या साऱ्यांची उकल ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या नव्या पर्वात होणार आहे.
यंदाचा ‘दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रम टीजेएसबी बँक या बँकिंग पार्टनरबरोबर पार पडत आहे. येत्या गुरुवारी, ११ ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता तो स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथे होणार आहे.
‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक भांडवली बाजाराचे अभ्यासक अजय वाळिंबे हे यावेळी आपल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून ‘शेअर्समध्ये गुंतवणुकीची सुयोग्य वेळ’ सांगणार आहेत. भांडवली बाजारातील व्यवहार, कंपनी समभागांची निवड, परतावा तसेच तांत्रिक बाबी ते यावेळी उलगडून दाखवतील. तर ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ कसा करावा हे अर्थ सल्लागार तृप्ती राणे या विशद करतील. जमा, खर्च व बचत-गुंतवणूक या प्रमुख बाबी नजरेसमोर ठेवून आर्थिक नियोजन करताना काय पाहावे, काय पाळावे, हे त्या सोदाहरणासह सांगतील.
उपस्थित गुंतवणूकदार, श्रोते तसेच ‘लोकसत्ता’चे वाचक यांना यावेळी वक्त्यांना गुंतवणुकीबाबतच्या शंका विचारून त्यांचे निरसन करून घेण्याची संधी उपलब्ध आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. कार्यक्रमाकरिता काही जागा निमंत्रितांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
* कधी : गुरुवार, ११ ऑगस्ट २०१६
* केव्हा : सायंकाळी ६ वाजता
* कुठे : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर
* प्रवेश विनामूल्य. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.