या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानहून मुंबईत आलेले १२ कोटींचे ‘हेरॉईन’ अमली पदार्थ विरोधी पथकाने हस्तगत केले. हा साठा मुंबईसह अन्य राज्यांत वितरित करणारे राजेश जोशी (५०), मुत्तुस्वामी कवांदर (४२) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखालील प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे आणि पथक गेल्या सहा महिन्यांपासून ‘हेरॉईन’च्या या बडय़ा वितरकांच्या मागावर होते. या कारवाईमुळे हेरॉईनची वितरण-विक्री साखळी उद्ध्वस्त करण्यात पथकाने यश मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहरात होणारा ८० टक्के हेरॉईन व्यापार जोशी, मुत्तुस्वामीच्या नियंत्रणात होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acquiring addictive substances abn
First published on: 06-01-2020 at 00:55 IST