पावसाच्या तडाख्याने उन्मळून पडणारे वृक्ष अथवा तुटणाऱ्या झाडाच्या फांद्या उचलण्यात कुचराई करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांवर आपत्कालीन प्राधिकरणाने कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मंगळवारी दिले. झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र काही वेळा कंत्राटदारांकडून वृक्ष छाटणी करण्यात येत नाही. परिणामी अस्ताव्यस्त वाढणारे वृक्ष वाहतुकीस अडथळा ठरतात. तर काही कंत्राटदार छाटलेल्या वृक्षाच्या फांद्या उचलत नाहीत. रस्त्यात पडून राहिलेल्या फांद्या आणि पालापाचोळा पावसाच्या पाण्यामुळे कुजतो आणि त्यामुळे परिसरात दरुगधी पसरते. तसेच मुसळधार पाऊस पडताच हा कचरा पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर बसून परिसर जलमय होतो, अशी तक्रार वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी केली. त्यावर कामचुकारपणा करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांवर आपत्कालिन प्राधिकरणातील नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2013 रोजी प्रकाशित
तुटलेल्या फांद्या रस्त्यांवर दिसल्यास साहाय्यक आयुक्तांवर कारवाई
पावसाच्या तडाख्याने उन्मळून पडणारे वृक्ष अथवा तुटणाऱ्या झाडाच्या फांद्या उचलण्यात कुचराई करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांवर आपत्कालीन प्राधिकरणाने कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मंगळवारी दिले. झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र काही वेळा कंत्राटदारांकडून वृक्ष छाटणी करण्यात येत नाही.
First published on: 10-07-2013 at 03:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will take on assistant commissioner of notice trees branches on streets