अभिनेत्री जिया खान हिच्यावर बुधवारी दुपारी जुहू येथे दफनविधी करण्यात आले. जियाने सोमवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान जुहूतील सागर संगीत अपार्टमेंटमधील आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नैऱाश्यामुळे जियाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
जियाला अखेरचा निरोप देण्यासाठी तिच्या कुटुंबीयांसमवेत बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. साश्रूपूर्ण नयनांनी जियावर दफनविधी करण्यात आले. अभिनेता आमीर खानची पत्नी किरण राव, रितेश देशमुख, आदित्य पांचोली, त्यांचा मुलगा सुरज, रझा मुराद, उर्वशी ढोकलिया यावेळी उपस्थित होते. अभिनेता आमीर खानने मंगळवारी रात्री जियाच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांच्या सांत्वन केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2013 रोजी प्रकाशित
साश्रूपूर्ण नयनांनी अभिनेत्री जिया खानवर दफनविधी
जियाला अखेरचा निरोप देण्यासाठी तिच्या कुटुंबीयांसमवेत बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.
First published on: 05-06-2013 at 05:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress jiah khan buried in mumbai