व्हिवा लाउंजमध्ये आज महिला वैमानिक आदिती परांजपे यांच्याशी संवाद साधण्याची संधी

वैमानिक बनून गगनभरारी घेण्याचे स्वप्न लहानपणी अनेक जण उराशी बाळगतात. मात्र ते प्रत्यक्षात उतरवण्याचे भाग्य सर्वानाच लाभते असे नाही. कॅप्टन आदिती परांजपे यांनीही हे स्वप्न पाहिले आणि ते खेरही करून दाखवले.  स्त्री वैमानिक म्हणून त्यांची जडणघडण आणि कॉकपिटमधील आव्हानात्मक अनुभवांविषयी त्यांच्याकडूनच जाणून घ्यायची संधी सोमवारी होणाऱ्या व्हिवा लाउंज या कार्यक्रमातून मिळणार आहे.

Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की

लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या मंचावरून विविध क्षेत्रांत धडाडीने काम करणाऱ्या तरुण स्त्रियांशी मुक्त संवाद साधता येतो. त्यांच्या कामातून प्रेरणा घेण्याबरोबरच त्या क्षेत्राची जवळून ओळख करून घेण्याचा उद्देशही या कार्यक्रमाचा असतो. या वेळी व्हिवा लाउंजमध्ये प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रातील कॅप्टन आदिती यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

वैमानिक होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, कुठली कौशल्ये लागतात, या क्षेत्रातील नोकरीच्या संधी किती आहेत आणि आव्हाने काय आहेत याबाबत आदिती परांजपे यांच्याशी संवाद साधता येईल. जेट एअरवेअजमध्ये कमांडर असणाऱ्या आदिती, प्रवासी वाहतूक करणारे बोइंग ७३७ विमान सराईतपणे चालवतात. यासंदर्भातील कुठलीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसतानाही, मराठी माध्यमात शिकलेली ही मुलगी वैमानिकबनली हे विशेष.

वेगाने विस्तारणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि त्याबाबतचे अनुभव या तरुण कमांडरकडून ऐकता येतील. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळेल.

 

* कधी – आज, सोमवार, १८ एप्रिल

*  कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्कसमोर, दादर (प.)

* वेळ – सायंकाळी ४.४५ वाजता.