अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासंदर्भातील विषयावरुन सध्या प्रमुख सत्ताधारी पक्ष असणारा शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपाने मुंबईमधील सोमय्या मैदानावर आयोजित केलेल्या बुस्टर सभेमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलनामधील शिवसेनेच्या सहभागासंदर्भात प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. आपण ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पाडली तेव्हा तिथे उपस्थित होतो पण शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असा दावा फडणवीस यांनी जाहीर सभेमधून केलाय. या दाव्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलेलं असतानाच राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय.

नक्की पाहा हे फोटो >> ‘सरड्यासारखे रंग’, ‘सुपारी’, निवांत सभा अन् नक्कल करत म्हणाले “काय एकदाचं…”; अजित पवारांची राज ठाकरेंविरोधात टोलेबाजी, बॉडीगार्ड्सही लागले हसू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. “हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्याकरिता तिथे होता. या राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसनं घालवले,” असं फडणवीस यांनी भाषणात म्हटलंय. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. “मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली,” असं विधान फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केलं.

बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

नक्की वाचा >> ‘फडणवीस ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर…’, शिवसेनेचा राज ठाकरेंवरही निशाणा; म्हणाले, “मतपरिवर्तनामागे नक्की कोणता…”

राऊत यांनी काय उत्तर दिलं
शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले.

शिवसेना नेते खासदार सतीश प्रधान, मोरेश्वर सावे, विद्याधर गोखले यांच्यासह अनेक नेते व शिवसेना कार्यकर्ते राममंदिर आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेना भवनमध्ये विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता. माझी अयोध्या खटल्यात चार वेळा साक्ष झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह काही शिवसेना नेत्यांवर याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा >> “लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी…”; फडणवीसांचा धावातानाचा जुना फोटो शेअर करत शिवसेना आमदाराचा टोला

आदित्य ठाकरेंचा टोला
सोमवारी बेस्ट उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कॅनटीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आदित्य ठाकरेंना या वादासंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दिनी झालेल्या दोन्ही सभांचा उल्लेख करत आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढतोय. आम्ही मूळ मुद्द्यांवर काम करतोय. महाविकास आघाडी सरकार हे लोकांची कामं करत आहे. लोकांची चूल कशी पेटती राहील यासाठी आम्ही काम करतोय, असं आदित्य म्हणाले. मात्र राज्यातील विरोधी पक्षातील नेते लोकांची घरं पेटवण्याची कामं करत आहेत, असा टोला आदित्य यांनी लगावला.

फडणवीसांनी आपण बाबरी पाडली तेव्हा अयोध्येमध्ये होतो असा दावा केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असताना आदित्य ठाकरेंनी, “१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल,” अशी मोजक्या शब्दांमध्ये खोचक प्रतिक्रिया नोंदवली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray slams devendra fadnavis over babri issue scsg
First published on: 03-05-2022 at 09:01 IST