मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु होती. यानंतर न्यायालयात काय घडलं यासंबंधी  प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला. यावेळी तिथे उपस्थित इतर वकिलांनी त्या व्यक्तीला अडवत त्याला चांगलाच चोप दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुणरत्न सदावर्ते यांनी याआधीही आपल्याला धमक्या मिळत असल्याचं सांगितलं होतं. आज न्यायालयातही या विषयावर चर्चा झाली. हल्ला होण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आम्ही प्रसारमाध्यमांशी का बोलतो यावर प्रश्न विचारण्यात आला ? यावर आम्हाला एक हजाराहून जास्त धमक्या मिळाल्या आहेत. आमची हत्यादेखील केली जाईल असं आम्ही न्यायालयात सांगितलं. यावर न्यायालयाने दोन्ही पक्षांना अशा प्रकारे धमकावणं चुकीचं असल्याचं सांगितलं.

न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला असता न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला आपलं मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. न्यायालयातील जबाबादार व्यकीतर पक्षपातीपणाचा आरोप करणं चुकीचं आहे असं स्पष्ट केलं होतं.

मारहाण करणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव वैजनाथ पाटील असून जालना जिल्ह्याचे रहिवासी असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. वैद्यनाथ पाटील नेमका कोण आहे याबद्दल माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advocate gunratn sadavarte attacked outside mumbai hc
First published on: 10-12-2018 at 13:50 IST