महापालिकेतील अनुज्ञापन खात्यातील रिक्त पदे न भरल्याने अपुरा मनुष्यबळ, वाहनांचा अपुरा पुरवठा, विहित वेळेत न झालेल्या अंतर्गत बदल्या यामुळे येथील निरीक्षक, वरिष्ठ निरीक्षक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत ही पदे न भरल्यास व बदल्या न झाल्यास १ एप्रिलपासून महापालिकेच्या अनुज्ञापन खात्यातील सर्व निरीक्षक व वरिष्ठ निरीक्षक, कामगार यांनी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्यातील सह-अनुज्ञापन अधीक्षक संवर्गाचे १ पद, उपअनुज्ञापन अधीक्षकांचे १ पद, साहाय्यक अनुज्ञापन अधीक्षकांचे १ पद, वरिष्ठ निरीक्षक संवर्गाची १७ पदे अशी एकूण २० पदे आणि निरीक्षक संवर्गाची ५० पदे, कामगारांची ६० पदे आदी पदे रिक्त आहेत. यांमुळे सध्या कार्यरत असलेल्या वरिष्ठ निरीक्षक व निरीक्षकांवर ताण येत असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनने पत्राद्वारे स्पष्ट केले. तसेच, अतिक्रमण कारवाई करताना वाहनांचा अपुरा पुरवठा व वरिष्ठांची दादागिरी यांमुळे निरीक्षकांमध्ये असंतोष पसरल्याचेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत पदोन्नतीची पदे व अंतर्गत बदल्या न केल्यास १ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धीपत्राद्वारे युनियनने दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2016 रोजी प्रकाशित
महापालिकेच्या अनुज्ञापन खात्यातील निरीक्षकांचे आंदोलन
वरिष्ठ निरीक्षक व निरीक्षकांवर ताण येत असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनने पत्राद्वारे स्पष्ट केले
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-03-2016 at 00:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of municipal licensing department inspectors