महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी झाल्याचे पाहायला मिळाले. थेट बोलण्याचा स्वभाव असल्यामुळे अजित पवार यांनी नाराजी बोलून दाखवली. कार्यक्रमातील निवेदिकेच्या सूचनांमुळे अजित पवार यांच्यासह सर्वच उपस्थितांना वारंवार खुर्चीवरुन उठ-बस करावी लागली. त्यामुळे याबाबत भाषणाच्या सुरवातीला अजित पवार यांनी मिश्किलपणे नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सुरुवातीपासून मी बारकाईने बघतोय. निवेदिकेने एवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांना बसा-उठा करायला लावलं. मुख्यमंत्री उठायचे त्यामुळे आम्हाला सुद्धा उठावं लागत होतं आणि बसावं लागत होतं. एकदाचं सांगितलं असतं तर सर्व संपल असत. पण तुमच्या हातात माईक असल्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही. अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही,” असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, “सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ही संकल्पना, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आजचा पर्यटन दिन साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक फोटोग्राफर्सनी राज्यातील पर्यटनाचे छान फोटो काढले. ते फोटो बघून महाराष्ट्रात खूप काही आहे, हे समजते. एवढी सुंदर फोटोग्राफी आहे की बोलायला शब्द अपूरे पडतात. जे चांगल आहे त्याचं महाराष्ट्र नेहमीच कौतुक करत असतो.”

डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

राज्यात मास्टर शेफ कार्यक्रम झाला यातील विजेत्यांना पारितोषक दिली पण त्यांनी थोडी तरी चव दाखवली असती तर आम्हला पटलं असतं, अशी मिश्किल टीपण्णी देखील यावेळी अजित पवार यांनी केली. राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती उद्योगांमध्ये वाढ, रोजगाराची संधी, राज्याचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास अशा अनेक गोष्टी पर्यटन विकासाच्या वतीने पुढे नेणं शक्य आहे. त्यामुळे या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांना दिल्याचे अजित पवार म्हणाले. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar displeasure at the inauguration of the program organized on the occasion of world tourism day cm uddhav thackeray srk
First published on: 27-09-2021 at 15:07 IST