नागपूर: कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेकडे होती आणि राहिलही ,असा दावा करीत ही जागा आम्ही अडिच लाख मतांनी जिंकू, असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

सामंत गुरुवारी नागपूर येथे पक्षाच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्याशी विमानतळावर पत्रकारांनी संवाद साधला. जागा वाटपासाठी वेळ का लगतो आहे याबद्दल विचारणा केली असता त्यांनी लवकरच जागा वाटप होईल व यादी जाहीर केली जाईल, असे सांगितले. सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ शिवसेनेचा आहे. आता तेथे सेनेचे खासदार आहे. पण ते आमच्या सोबत नाही. पण ही जागा शिंदे गटच लढणार व जिंकणार, असे सामंत म्हणाले.

maneka gandhi varun gandh
भाजपाने वरुण गांधींचं लोकसभेचं तिकीट कापलं, आई मनेका गांधी म्हणाल्या, “या निवडणुकीनंतर…”
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
chavadi maharashtra political crisis
चावडी : राणे आणि भुजबळांची वेगळी तऱ्हा
Narayan rane and uday samant
रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघाचा पेच सुटेना, किरण सामंतांची माघार नाहीच! उदय सामंत म्हणाले, “ती जागा…”

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

हेही वाचा – बुलढाण्यात महायुतीत महाफूट, भाजप लोकसभा प्रमुखांचे बंड; उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा – “बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

पूर्व विदर्भातील रामटेकची जागा शिंदे गटाला सुटली आहे. तेथे शिंदे गटाने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना डावलून कॉंग्रेसमधून आलेले राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिक नाराज आहे. तुमानेसुद्धा नाराज आहेत. आज सामंत यांनी तुमाने यांची भेट घेतली व चर्चा केली.