करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवडय़ात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी विशेष मदतीची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाचे अर्थचक्र मोठय़ा प्रमाणावर थांबलेले असताना आणि सर्वच स्तरांतील नागरिकांमध्ये भविष्याची चिंता गडद झालेली असताना पुढील काळात आपल्यासमोर कोणती आव्हाने असतील याची तपशिलात चर्चा ‘लोकसत्ता विश्लेषण’ या उपक्रमाच्या नव्या पर्वात विख्यात अर्थविश्लेषक डॉ. अजित रानडे करणार आहेत. येत्या मंगळवारी (२६ मे) ५ वाजता वेबसंवादाच्या माध्यमातून होणाऱ्या या चर्चासत्राचा लाभ अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सजग आणि सुजाण नागरिकांना घेता येणार आहे. वाचकांच्या मनातील कुतूहल आणि प्रश्नांना या वेबसंवादातून उत्तरे मिळतील.

सहभागी कसे व्हाल? 

http://tiny.cc/Loksatta_Vishleshan_26May या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर संदेश येईल. त्यानंतर या वेबसंवादात भाग घेता येईल. अधिक माहितीसाठी  https://loksatta.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit ranade in loksatta vishleshan abn
First published on: 24-05-2020 at 00:25 IST