विधान परिषदेसाठी नांदेडमध्ये अमर राजूरकर यांना संधी

मराठा समाजाच्या मोर्चावरून सध्या राज्याच्या राजकारणातील वातावरण ढवळून निघाले असतानाच विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची याचा पेच झाला होता. विद्यमान आमदार अमर राजूरकर यांनाच पुन्हा उमेदवारी देऊन पक्षाकडून सामाजिक समतोल राखला जाणार आहे.

No sign of Gandhis yet from Amethi
राहुल अन् प्रियंका गांधी दोघांनीही निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा; पण घोषणा नाही, काँग्रेसचं चाललंय काय?
Sangli Congress Melava
सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात गोंधळ; विशाल पाटील समर्थकांची घोषणाबाजी
ips abdur rahman marathi news, ips abdur rahman latest news in marathi
“लोकसभेच्या ४८ जागांवर काँग्रेस, भाजपकडून मुस्लिमांना प्रतिनिधीत्वच नाही”, वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांची टीका
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप

अमर राजूरकर हे ब्राह्मण समाजातील असून, नांदेड मतदारसंघात त्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की, असा प्रश्न निर्माण झाला होता. मराठा समाजाचे आंदोलन लक्षात घेता मराठा किंवा मराठेतर नेत्याला उमेदवारी दिली जावी, अशी चर्चा सुरू झाली होती. नांदेडच्या काँग्रेसच्या राजकारणात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे एकहाती वर्चस्व आहे. आमदार राजूरकर हे अशोकरावांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनीच राजूरकर यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय पक्का केला आहे.

नांदेडमध्ये काँग्रेसच्या विरोधात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी हे एकत्र आहेत. अशोक चव्हाण यांना शह देण्याकरिता राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नेहमी भाजप-शिवसेनेबरोबर असतात, असा अनुभव आहे. राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेला एक अधिकारी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार म्हणून िरगणात उतरण्याची शक्यता आहे. पक्ष जातीपातीचे राजकारण कधीच करीत नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

राष्ट्रवादीच्या हटवादामुळे आघाडी तुटली – विखे

सांगली : विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हट्टाग्रही भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडी तुटल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. विधानपरिषद निवडणुकीवरून सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच पुन्हा जुंपली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होऊ न शकल्याने सध्या हे दोन्ही पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांना विचारले असता त्यांनी वरील टीका केली.  विखे-पाटील म्हणाले, की विधानपरिषदेच्या सहा जागांपकी ३ जागांची आम्ही मागणी केली होती. यामध्ये खरेतर काँग्रेसची भूमिका समजुतीची आणि सामंजस्याचीच होती. मात्र राष्ट्रवादीनेच समजूदारपणा दाखविला नाही.

त्यांच्या काही नेत्यांच्या हट्टाग्रही भूमिकेमुळे आमची आघाडी तुटली. दरम्यान आघाडी झाली नसली, तरी युती शासनाच्या विरोधात उभय काँग्रेसची समन्वयी भूमिका कायम राहील, असे मतही त्यांनी नोंदवले.