अंबरनाथ नगराध्यक्षपद निवडणुकीत आघाडीच्या पराभवास जबाबदार चार नगरसेवकांपैकी एक नासिर कुंजाली हा राष्ट्रवादीचा असून त्याच्या विरोधात येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास शहरातील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील, असे आज शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी जाहीर केले. २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीतही पक्षाची एक नगरसेविका गैरहजर राहिली होती. त्यावेळी तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आता गद्दारी करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई न झाल्यास दिवाळीपूर्वीच पक्षाचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2012 रोजी प्रकाशित
अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांचा राजीनाम्याचा इशारा
अंबरनाथ नगराध्यक्षपद निवडणुकीत आघाडीच्या पराभवास जबाबदार चार नगरसेवकांपैकी एक नासिर कुंजाली हा राष्ट्रवादीचा असून त्याच्या विरोधात येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास शहरातील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील,
First published on: 08-11-2012 at 03:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath ncp corporator threat to resign