अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास एलआयसी योजनेंतर्गत ठोक एकरकमी लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे केली. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेले आपले आंदोलन मागे घेतले.
विविध मागण्यांसाठी राज्यभरातील लाखो अंगणवाडी सेविकांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन छेडले होते. मंगळावारी आंदोलनकर्त्यांशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांच्या मागण्या मान्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांना एलआयसी योजनेंतर्गत एक रकमी लाभ देण्याची योजना तयार करण्यात आली असून त्यास मान्यता देण्यात आली. या योजनेनुसार सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेस एक लाख रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकेस अथवा मदतनीस यांना ७५ हजार रूपये मिळतील. तसेच एखाद्या अंगणवाडी सेविकेचे निधन झाले तर त्यांच्या वारसांना ही रक्कम मिळेल. त्यासाठी एलआयसीला राज्य सरकार पहिला हप्ता म्हणून ४९ कोटी रुपये देणार असून त्यानंतर अंगणवाडी सेविकांचे प्रत्येक महिन्याला २०० रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे १०० रुपये असे तीन कोटी तीन लाख रूपये प्रत्येक महिन्याला सरकारतर्फे एलआयसीत भरले जाणार आहेत. या योजनेचा लाभ दोन लाख सहा हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
अंगणवाडी सेविकांना एकरकमी मदत मिळणार
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास एलआयसी योजनेंतर्गत ठोक एकरकमी
First published on: 06-02-2014 at 12:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anganwadi workers get hike in retirement benefits