मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गेले १४ महिने तुरुंगात राहिलेले  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर बुधवारी सुटका झाली. ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

 शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अनिल देशमुख यांना ‘ईडी’ने अटक केली होती. देशमुख हे तब्बल चौदा महिने आर्थर रोड तुरुंगात होते. न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यावर केंद्रीय तपास यंत्रणेने निर्णयाला आव्हान देण्यासाठी स्थगिती मिळवल्यामुळे जामीन मंजूर होऊनही १७ दिवस देशमुख तुरुंगातच होते. उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगितीच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर अखेर बुधवारी त्यांची आर्थर रोड तुरूंगातून सुटका झाली.

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
What Amit Shah Said About Uddhav Thackeray And Sharad Pawar?
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी

अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमा झाले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास देशमुख तुरुंगातून बाहेर पडले. त्यांचे मोठय़ा जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तुरुंगापासून सिद्धीविनायक मंदिरापर्यंत देशमुख यांच्या स्वागतासाठी दुचाकी फेरी काढली. त्यानंतर देशमुख हे सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन चैत्यभूमीवर गेले.

दुचाकी फेरीला परवानगी नाकारली

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आर्थर रोड तुरुंगापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत दुचाकी रॅली काढली. मात्र, या फेरीत मोठया प्रमाणात लोक सहभागी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे नमूद करत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चंद्रमोरे यांनी तशी नोटीसही बजावली होती. त्यानंतरही फेरी काढण्यात आल्यामुळे पोलीस आयोजकांवर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस देशमुखांच्या पाठीशी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक सर्व वरिष्ठ नेते देशमुख यांच्या स्वागताला ऑर्थर रोड कारागृहाबाहेर उपस्थित होते. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील हे खास मुंबईत आले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी यावेळी उपस्थित होते. देशमुख यांची सुटका होताच कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीची बडी मंडळी देशमुख यांच्या स्वागताला उपस्थित राहिल्याने पक्ष त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचा संदेश गेला. या सरकारची दडपशाही टोकाला गेली आहे. १३ महिन्यानंतर अखेर न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. हे फक्त भारतातच घडू शकते. आम्हाला अपेक्षा आहे की नवाब मलिक यांनाही देशमुख यांच्याप्रमाणे एक दिवस न्याय मिळेल. खोटय़ा आरोपांवर १३ महिने तुरूंगात काढावी लागली. हे नुकसान कोण भरून काढणार?’ असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशमुख यांना मिळालेल्या जामिनाबाबत समाधान व्यक्त केले. ‘‘अखेर न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. देशमुखांना मुंबईबाहेर जाण्यास अजून न्यायालयाची मनाई आहे. म्हणून आम्ही नागपूरहून येथे त्यांच्या स्वागताला आलो’’, असे पवार म्हणाले.

माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ते ऐकीव माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले. सचिन वाझे यांच्याही आरोपात तथ्य नाही. या निराधार आरोपांमुळे मला तुरुंगात राहावे लागले. मात्र, मला खोटय़ा गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयानेही नोंदवले आहे.

-अनिल देशमुख, माजी गृहमंत्री