राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरी इडीने शुक्रवारी छापे टाकले होते. दिवसभर या छाप्यांमधून चौकशीचं काम झाल्यानंतर संध्याकाळी अनिल देशमुखांनी पत्रकारांशी बोलताना ईडीला पूर्ण सहकार्य करण्याची माहिती दिली होती. त्यापाठोपाठ आज सकाळी ईडीनं त्यांचे स्वीय सहय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना अटक केली. त्यानंतर अनिल देशमुख यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. समन्स नंतर अनिल देशमुख यांचे वकील ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरता आणखी वेळ मागितला आहे.  कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने आज समन्स बजावले होते.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले होते. त्यावर त्यांच्या वकिलांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागणारा अर्ज सादर केला आहे. त्यावर ईडी या अर्जावर विचार करेल आणि नवीन तारीख देईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकशीला हजर राहण्यासाठी मागितला आणखी वेळ

“आम्ही ईडीला पत्र दिले आहे आणि कोणत्या प्रकरणाबाबत ही चौकशी सुरु आहे हे आम्हाला माहिती नाही. त्याची माहिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही. आता ईडीने यावर निर्णय घ्यावा,” असे अनिल देशमुख यांचे वकील अ‍ॅड जयवंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने शुक्रवारी रात्री त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शनिवारी सकारळी ११ वाजता ईडीने अनिल देशमुख यांनी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते.

…आम्ही पण बघून घेऊ; संजय राऊत भाजपावर भडकले

परमबीर सिंह यांच्या पत्राने उडाली होती खळबळ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. “मुंबईतील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिलं होतं”, असा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रामध्ये केला होता. या पत्रानंतर झालेल्या उडालेल्या गदारोळानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सीबीआय आणि नंतर ईडीनं त्यांच्या घरांवर छापे टाकल्यामुळे टाकले होते.