मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन’ ही मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यातील कविता राजकीय क्षेत्रात कायम स्मरणात राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना फडणवीस यांनी गेल्या तीन महिन्यांत दुसरी गीतरचना केली आहे. ‘शिवशंकर महादेवा’वर त्यांनी रचलेले गीत महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शुक्रवारी प्रसारित करण्यात आले. त्यांची पत्नी अमृता फडणवीस या गायिका म्हणून नावलौकिक मिळवत असताना आता फडणवीस हेही वेळात वेळ काढून गीतरचना करीत आहेत. फडणवीस यांनी विधिमंडळात आणि २०१९ च्या निवडणूक प्रचारकाळात सादर केलेली ‘मी पुन्हा येईन’ या कवितेवर बरेच राजकीय पडसाद उमटले आणि आजही अनेकदा त्याची आठवण केली जाते.

हेही वाचा >>> भारत जोडो न्याय यात्रेची १७ मार्चला सांगता; शिवाजी पार्कवर जाहीर सभा, सभेला सरकारची परवानगी

What Aditya Thackeray Said?
“एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, त्यानंतर मातोश्रीवर आले आणि..”, आदित्य ठाकरेंचा दावा
MP Vinayak Raut On Raj Thackeray
विनायक राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका; म्हणाले, “फूस झालेली लवंगी फटाके…”
Chef Vishnu Manohar Prepares 10000 Kg Misal To Mark Mahatma Phule Jayanti
शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली १० हजार किलोंची मिसळ; अजित पवार अन् चंद्रकांत पाटलांनीही मारला ताव, पाहा Video
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..

उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराचे लोकार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने श्रीरामांविषयी गीत लिहिले होते. आता त्यांनी ‘देवाधिदेव महादेव’ हे शिवशंकरावर गाणे लिहिले असून ते गायक व संगीतकार शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांनी गायले आहे.

फडणवीस यांनी आमदार झाल्यावर २०-२२ वर्षांपूर्वी तयार कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात केली होती. त्याचे कटआऊट्स पाहिल्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही फडणवीस यांना बोलावून त्याचे कौतुक केले होते. तसेच मराठी भाषानिमित्ताने विधान भवनात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येकास स्वरचित कविता सादर करावी, अशी विनंती केली. त्या वेळी फडणवीस यांनी लगेच ‘तुमची आमची मायमराठी’ अशी कविता रचून सादर केली होती.