बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप चौकशीसाठी वर्सोवा पोलीस स्थानकात हजर झाला आहे. लैंगिक शोषण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी अनुराग कश्यपची आज चौकशी होणार आहे. अभिनेत्री पायल घोष हिने काही दिवसांपूर्वी अनुरागवर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पायल घोषने अनुरागवर आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला बुधवारी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, आज  गुरुवारी अनुरागची चौकशी होणार असून तो चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याच्यासोबत त्याची वकील प्रियांका खिमानीदेखील असल्याचं सांगण्यात येत आहे.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट काही दिवसांपूर्वी पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट करत अनुराग कश्यपने पायलला उत्तर दिलं होतं.

दरम्यान, अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या पायल घोष हिने ‘वाय श्रेणी’तील सुरक्षेची मागणी केली आहे. अनुराग विरोधात पोलीस तक्रार केल्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्यांमुळे तिच्या जीवाला धोका आहे. परिणामी सरकारने पायलला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा द्यावी, अशी मागणी तिचे वकिल नितिन सातपुते यांनी केली आहे. ही सुरक्षा मिळवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना एक विनंती अर्ज देखील लिहिला आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag kashyap will face police interrogation first time in molestation case ssj
First published on: 01-10-2020 at 11:06 IST