मुंबई: ध्वनीक्षेपकाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असताना त्याच्या परवानगीसाठी पोलिसांकडे ८४ अर्ज आल्याचे मुंबईचे  पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले. मुंबई पोलिसांकडे ध्वनीक्षेपकांच्या परवानगीसाठी ८४ अर्ज आले आहेत. आणखी अर्ज आले तर त्यांनाही परवानगी देण्यात येणार आहे, असे पांडे यांनी स्पष्ट केले.  सर्वाना एकत्र आणून सर्वाशी संवाद साधणे शक्य नाही, त्यामुळे रहिवासी संघटना व मोहल्ला कमिटी यांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन केली असून त्यांच्याशी आपण दर महिन्याला संवाद साधणार असल्याचे यावेळी रहिवासी संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलताना आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी रहिवासी संघटना, मोहल्ला कमिटी यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवारी सामाजिक सलोखा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी रहिवासी संघटना आणि मोहल्ला कमिटी यांना एकत्र आणून सिटीझन फोरम स्थापन करण्याची इच्छा आयुक्तांनी व्यक्त केली.यावेळी सामाजिक सलोखा टिकवण्यावर पांडे यांनी भर दिला. या कार्यक्रमात निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते.

सिटीझन फोरम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहल्ला कमिटी आणि रहिवासी संघटनांच्या  समितीला सिटीझन फोरम असे नाव देता येईल. त्यासाठी नागरी विधेयक बनवून पुढे कायद्यातही रुपांतर करण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. उपस्थितांपैकी काहींनी एकत्र येऊन या फोरमचा ममुदा तयार केला करावा, असे आवाहन  आयुक्त पांडे यांनी केले.